नवी दिल्ली वृत्तसंस्था - पॉर्नस्टारला पैसे दिल्याप्रकरणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मंगळवारी अटक करण्यात आली. गुन्हे...
नवी दिल्ली वृत्तसंस्था-
पॉर्नस्टारला पैसे दिल्याप्रकरणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मंगळवारी अटक करण्यात आली. गुन्हेगारी खटल्याप्रकरणी अटक झालेले ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. तासाभराच्या सुनावणीनंतर ट्रम्प हे न्यायालयाबाहेर पडले आणि माध्यमांना प्रतिक्रिया न देताच तिथून निघून गेले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ डिसेंबर रोजी होणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे मंगळवारी त्यांच्या खासगी विमानाने दाखल झाले. त्यानंतर त्यांचा ताफा मॅनहटन येथील ‘ट्रम्प टॉवर’कडे रवाना झाला. त्यांच्या या निवासस्थानाभोवती नाकेबंदी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त राखण्यात आला होता.भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्या खटल्याची सुनावणी सुरू झाली.
ट्रम्प हे न्यायालयात हजर झाले. यानंतर ट्रम्प यांना पोलिसांनी अटक केली. ट्रम्प हे २०२४ मधील निवडणूक लढविणार असल्याने हा खटला त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.२०१६ मध्ये अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ट्रम्प यांच्या सांगण्यावरून पॉर्न फिल्म स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे देण्यात आले होते. स्टॉर्मीने दावा केला होता की तिचे ट्रम्पसोबत अफेअर होते.
हे प्रकरण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या काही दिवसांआधीचं आहे. ऑक्टोबर 2016 च्या अखेरीस पॉर्न स्टार डॅनियल्सला त्याच्या तत्कालीन वैयक्तिक वकील मायकेल कोहेनच्या वतीनं 130,000 US डॉलर्सचं पेमेंट केल्या संबंधित आहे.
एका दशकापूर्वी ट्रम्प यांच्याशी असलेल्या कथित संबंधांबद्दल पॉर्न स्टारनं कोणताही खुलासा करु नये. तसेच याप्रकरणा संबंधात कोणतीही वाच्यता करु नये यासाठी ही रक्कम पॉर्न स्टारला पुरवल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
COMMENTS