विजय औटी यांचा खासदार सुजय विखेंवर हल्लाबोल पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुका विधानसभा मतदार संघ घालवण्याचा प्रयत्न कोणी केला केला. तसेच...
विजय औटी यांचा खासदार सुजय विखेंवर हल्लाबोल
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुका विधानसभा मतदार संघ घालवण्याचा प्रयत्न कोणी केला केला. तसेच अनेक वेळा स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलले अशा लोकांनी आम्हाला निष्ठा व स्वाभिमान शिकवू नये अशी खरमरीत टीका माजी आमदार विजय औटी यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांचे नाव न घेता केली.
पारनेर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचाराच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास मंडळाच्या प्रचार सभेत औटी बोलत होते. ते म्हणाले पारनेर मतदारसंघ घालवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले. त्यांना त्याची शिक्षा भोगावी लागली. ज्यांनी मतदारसंघ घालविण्यासाठी प्रयत्न केले. अनेक वेळा स्वताःच्या फायद्यासाठी पक्ष बदलले त्यांनी आम्हाला स्वाभिमान आणि निष्ठा शिकू नये.
पारनेर मतदार संघ टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्यामुळे माझे भले झाले. मात्र ज्यांनी तो रद्द व्हावा यासाठी प्रयत्न केले. त्यांचे शिक्षा मात्र त्यांना भोगावी लागली. राज्यात महाविकास आघाडी असल्याने आम्ही तालुयातही आघाडी केली आहे. विरोधकांना आम्ही दोघे एकत्र आल्याचे दुःख का? त्यांच्या पोटात का दुखले हा मोठा प्रश्न आहे. विरोधक अनेक दिवसापासून टीका करत आहेत. की यांची युती ही एक दिवसात झाली नाही युती एक दिवसात होत नसते हे एकमेकांच्या संपर्कात सहा महिन्यापासून होते पण मी त्यांना सांगू इच्छितो की एक दिवसातच युती झाली आहे.
सत्ता ही क्षणभंगुर असते ती जशी येथे तशी जाते सुद्धा मी हा निर्णय घेतला तो शिवसेनेच्या माझ्या कडवट व निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी. राजकारण करताना समाजाचा विचार करावा लागतो.
आम्ही एकत्र आलो ते केवळ समाज व शेतकरी हितासाठी. आमच्याही पक्षातील काही मंडळींना लाभाच्या वेळी महाविकास आघाडी फायदेशीर वाटली गरजेची वाटली मात्र आता दुसर्याचा फायदा होत असताना मात्र महाविकास आघाडी कडवट वाटू लागले ही कसली आघाडी आणि ही कशासाठी आघाडी करावयाची अशी टीका ते करत आहेत. महाविकास आघाडीच्या जीवावर मोठे पद उपभोगून राजकारण केले. त्यावेळी महाविकास आघाडी चांगली होती. आता मात्र योग्य नाही असे वाटते.
यावेळी लंके म्हणाले समाज व शेतकरी हितासाठी आम्ही आघाडी केली आहे. कधी कधी समाजहितासाठी दोन पाऊले मागे यावे लागते. बाजार समितीच्या विकासासाठी व एक आदर्श बाजार समिती निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आजही आपली बाजार समिती आर्थिक द्रष्ट्या सुस्थीतीत व सक्षम आहे. मात्र या पुढेही शेतकरी हितासाठी बाजार समितीत शेतक-यांच्या शेतीमाल ठेवण्यासाठी शितगृह असणे गरजेचे आहे. या शिवाय शेतक-यांसाठी कृषीभवन या सारख्या सुविधा पुढील काळात कराव्या लागणार आहेत असेही लंके म्हणाले. यावेळी माजी सभापती प्रशांत गायकवाड, मारुती रेपाळे, निलेश खोडदे यांच्या सह कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
COMMENTS