नागपूर। नगर सहयाद्री - मोठ्या शहरामध्ये जलवाहिनी, सांडपाणी पाईपलाईन खराब होणे, लिकेज होणे, फुटने यासारख्या समस्या नेहमीच उद्भवत असतात. त्या ...
नागपूर। नगर सहयाद्री -
मोठ्या शहरामध्ये जलवाहिनी, सांडपाणी पाईपलाईन खराब होणे, लिकेज होणे, फुटने यासारख्या समस्या नेहमीच उद्भवत असतात. त्या समस्या सोडवण्यासाठी संपूर्ण जलवाहिनीचा तपास करावा लागतो. नागपूर 'निरी' अभियांत्रिकी संशोधन संस्थेनं एक सॉफ्टवेअर तयार केलं असून बसल्या जागी कळणार नेमकी कुठे जलवाहिनी, मलवाहिनी खराब आहे किंवा लिकेज आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, नागपूर महापालिकेसह चेन्नई, हैदराबाद आणि वर्धा प्रशासनाने या सॉफ्टवेअरचे यशस्वी प्रयोग केले आहे. जलवाहिनी, सांडपाणी पाईपलाईन खराब होणे, लिकेज होणे, फुटने यासारख्या समस्या नेहमीच उद्भवत असतात. मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये तर याचा सर्वाधिक त्रास होतो. अशा वेळी त्या दुरुस्ती करताना बरीच दमछाक होते. नेमकी पाईपलाईन कुठे खराब आहे, लिकेज आहे याची खात्रीशीर माहिती मिळत नाही.
नागपुरातील 'निरी' संशोधन संस्थेनं एक असं सॉफ्टवेअर केलंय ज्यामुळं नेमकी कुठे खराब जलवाहिनी आहे. निरीचे शास्त्रज्ञ आभा सारगावकर आणि आशिष शर्मा यांनी हे 'रिस्क पीनेट 2.0' हे सॉफ्टवेअर विकसित केलंय. गणितीय आधारावर हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आलं आहे. शहरातील सर्व जलवाहिन्या, मलवाहिन्या यांचा एक डेटा तयार करण्यात आला. यासाठी त्यांनी 'सॅफ्रा डब्लूडीएस' नावाचे पोर्टल तयार केलं.
शहरातील कुठे कुठे पाईपलाईन आहे, किती वर्षे जुने आहे, किती व्यासाचे आहे, किती प्रेशर आहे, कधी बदलले पाहिजे याची नकाशा सह संपूर्ण माहिती टाकण्यात आलीय. हे पोर्टल 'रिस्क पीनेट' शी जोडण्यात आले आहे. त्यामुळे जलवाहिनी आणि सांडपाणी पाईपलाईन ची अचूक माहिती मिळते आणि काही अडचण असल्यास ती त्वरित दुरुस्त करता येते.
COMMENTS