मुंबई : नगर सह्याद्री बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिचा मिली चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे जोरदा...
मुंबई : नगर सह्याद्री
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिचा मिली चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी कपूर दिसली होती. मिली या चित्रपटाची निर्मिती तिचे वडील बोनी कपूर यांनी केली. मात्र, या चित्रपटाला बॉस ऑफिसवर धमाका करण्यात यश मिळाले नाही. तो फ्लॉप गेला. आता जान्हवी कपूर हिला एका साऊथच्या मोठ्या अभिनेत्यासोबत बिग बजेटच्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली.
विशेष म्हणजे जान्हवी कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी जान्हवी कपूर बोल्ड फोटो शेअर करते. ती सध्या नेटकर्यांच्या निशाण्यावर आलीये. ती मालदीवमध्ये आहे. मालदीवमधून अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना जान्हवी कपूर दिसत आहे. जान्हवी कपूरने गुलाबी रंगाच्या बिकिनीवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तिचे हे फोटो चाहत्यांना आवडले नाही. त्यामुळे ती नेटर्यांच्या निशाण्यावर असून अनेकांनी तिला खडेबोल सुनावले.
एका युजर्सने तिच्या फोटोवर कमेंट करत म्हटले की, किती भारी आहे ना, आईच्या नावाने प्रसिद्ध व्हायचे किंवा थेट बॉडी दाखवून चित्रपट मिळवायचे. दुसर्याने लिहिले की, तू कितीही प्रयत्न केले तरी तू काइली जेनर होऊ शकत नाही. तिसर्याने लिहिले की, श्रीदेवी जिवंत असत्या तर त्यांना हे पाहून किती वाईट वाटले असते. जान्हवी कपूर ही ज्युनियर एनटीआरसोबत काम करणार आहे. काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले होते. त्यात ती हिरव्या रंगाच्या साडीमध्ये दिसत होती. विशेष म्हणजे चित्रपटाच्या सेटवरील काही फोटोही तिने शेअर केले होते.
COMMENTS