प्रेमाच्या नादात 'ते' फोटो व्हायरल नवी दिल्ली वृत्तसंस्था- उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात प्रेमनगर येथील बल्लमपूर भागात हा धक्कादा...
प्रेमाच्या नादात 'ते' फोटो व्हायरल
नवी दिल्ली वृत्तसंस्था-
उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात प्रेमनगर येथील बल्लमपूर भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.न सखी मामी २४ वर्षीय भाच्याच्या प्रेमात पडली. दोघांचे काही काळ अनैतिक संबंध सुरु होते. मात्र नंतर मामीला भाच्यापासून सुटका करुन घेण्याची इच्छा झाली. परंतु भाच्याला मामीचा डाव लक्षात आला आणि त्याने तिचे अश्लील फोटो व्हायरल केले. मामीला अडकवण्याचा कट भाच्याच्याच अंगलट आला आणि त्याची रवानगी तुरुंगात झाली.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, प्रेम नगर येथे राहणारा तरुण गुरुग्राममध्ये खाजगी सुरक्षा रक्षक होता. काही वर्षांपूर्वी त्याचे सख्ख्या मामीसोबत प्रेमसंबंध जुळले. मामी त्याच्या वयाच्या दुप्पट होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मामी त्याच्यापासून सुटका करु लागली होती. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. अखेर पीडित मामीने पोलिस ठाण्यात भाच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली.
संतापलेल्या तरुणाने मामीला धडा शिकवण्याचा प्लॅन आखला. त्याने स्वतःच्याच अपहरणाचा कट रचला आणि आठ मार्च रोजी तो बेपत्ता झाला. यानंतर ९ मार्च रोजी त्याने मामीच्या भावाचा फोन चोरला आणि या मोबाईलवरून आपल्या नातेवाईकांना अपहरणाचा संदेश पाठवला. अपहरणकर्ता असल्याचं भासवून त्याने एक लाख रुपयांची खंडणी मागितली. मेसेज पाहून तरुणाच्या पालकांनीही त्याचा शोध सुरू केला.
२० मार्च रोजी मामीच्या भावाच्या फोनवरून पोलिस अधिकाऱ्यांना अपहरणाचा संदेशही आला होता. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. तरुणाच्या शोधासाठी पाळत ठेवणारे पथकही तैनात करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीचा नुसार सापळा रचून आरोपी भाच्यास अटक केली. अटकेनंतर तरुणाने घडलेल्या प्रकरणाची कबुली दिली.
COMMENTS