मुंबई नगर सहयाद्री - सोशल मीडियावर सेलिब्रेटींना अनेकदा नेटकर्यांच्या टीकेला सामोरं जावं लागतं. अनेकदा काही नेटकरी पातळी ओलांडत सेलिब्रिटी...
मुंबई नगर सहयाद्री -
सोशल मीडियावर सेलिब्रेटींना अनेकदा नेटकर्यांच्या टीकेला सामोरं जावं लागतं. अनेकदा काही नेटकरी पातळी ओलांडत सेलिब्रिटींबद्दल आक्षेपार्ह विधान करत गंभीर आरोपही करत असतात. अनेकदा सेलिब्रिटी अशा नेटकर्यांकडे दुर्लक्ष करणं पसंत करतात. पण काही सेलिब्रिटी मात्र त्यांना सडेतोड उत्तर देतात. नुकतंच अभिनेत्री सेलिना जेटलीने गंभीर आरोप करणार्या अशाच एका नेटकर्याला सडेतोड उत्तर देत त्याचं तोंड बंद केलं आहे.
इतकंच नाही तर तिने थेट ट्विटरकडे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सेलिना जेटलीने ट्वीटवर आपल्या खासगी आयुष्याशी संबंधित गंभीर आरोप करणार्या एका नेटकर्याला खडे बोल सुनावले आहेत. आपण परदेशातील सेन्सॉर बोर्डाचे सदस्य असल्याचा दावा करणार्या या व्यक्तीने सेलिन जेटली अभिनेता फरदीन खान आणि त्याचे वडील फिरोज खान यांच्यासह शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. यावर सेलिना जेटलीने त्याला सडेतोड उत्तर दिलं.
सेलिना जेटली एकमेव अभिनेत्री आहे, जी वडील फिरोज खान आणि मुलगा फरदीन खान यांच्यासह अनेक वेळा झोपली आहे, असा गंभीर आरोप एका नेटकर्याने केला होता. यावर व्यक्त होताना सेलिना जेटलीने त्याला उत्तर दिलं की, प्रिय मिस्टर संधू, आशा आहे की हे पोस्ट केल्याने तुम्हाला पुरुष बनण्यासाठी आवश्यक परिघ आणि लांबी मिळाली असेल. तसंच आशा आहे की, तुम्हाला तुमच्या इरेटाइल डिसफंशनपासून बरे करतील
COMMENTS