पुणे। नगर सहयाद्री - पुण्यातून मोठी बातमी हाती अली आहे. पुण्यातील वारजेतून मुख्यमंत्री शिंदेंना उडवून देण्याच्या धमकीचा फोन आला आहे. महाराष्...
पुणे। नगर सहयाद्री -
पुण्यातून मोठी बातमी हाती अली आहे. पुण्यातील वारजेतून मुख्यमंत्री शिंदेंना उडवून देण्याच्या धमकीचा फोन आला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. सूत्राच्या माहितीनुसार ११२ नंबरवर फोन करून धमकी देण्यात आली होती. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
पहिल्यांदा त्याने अॅम्ब्युलन्ससाठी कॉल होता. पण अॅम्ब्युलन्स आली नाही म्हणून त्याने डायल ११२कॉल करुन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून टाकण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नशेखोर आहे. नशेत त्याने मुख्यमंत्र्यांना धमकी दिली.
सोमवारी १0 एप्रिल रात्री डायर ११२ वर फोन आला ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. "मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे" असं बोलून कॉलरने कॉल कट केला. डायल ११२ चं कंट्रोल रुम नागपूरमध्ये आहे, तिथेच हा कॉल आला होता.
या कॉलनंतर पोलीस सतर्क झाले. कॉल कुठून आला होता याचं लोकेशन त्यांनी ट्रेस केलं. पोलिसांना मिळालेल्या लोकेशननुसार कॉल पुण्यातील वारजे इथून आला होता. त्यानंतर पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि एका व्यक्तीला ताब्यात घेतलं.
पहिल्यांदा त्याने अॅम्ब्युलन्ससाठी कॉल होता. पण अॅम्ब्युलन्स आली नाही म्हणून त्याने डायल 112 कॉल करुन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून टाकण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नशेखोर आहे. नशेत त्याने मुख्यमंत्र्यांना धमकी दिली.
COMMENTS