मुंबई। नगर सहयाद्री - राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच पद जाणार,पदाची अदलाबदल होणार,अजि...
मुंबई। नगर सहयाद्री -
राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच पद जाणार,पदाची अदलाबदल होणार,अजित पवार मुख्यमंत्री होणार,अशा वेगवेगल्या चर्चेला उधाण आले आहे. अशातच एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.भाजपचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. आगामी काळात मुख्यमत्री बदलू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
वृत्तसंस्थाच्या म्महितीनुसार,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहेत. त्यात ते अचानक चार दिवसांच्या सुटीवर गेले. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली.दरम्यान दिल्लीतील भाजप हायकमांड एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याचे बोललं जात आहे. तसेच आमदार अपात्रतेचा निर्णय आल्यास तर एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांना राजीनामा तयार ठेवा, अशा सूचना दिल्याचे समजते.
भाजपने एकनाथ शिंदे यांना सोबत घेतले तेव्हा त्यांच्या अपेक्षा अशा होत्या की एक मराठा नेता आपल्यासोबत येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते भाजप आणि शिंदे गटाला सहकार्य करतील किंवा गळाला लागतील अशी अपेक्षा भाजप हायकमांडला होती.ग्रामपंचायत, नगरपरिषद निवडणुकांमध्ये शिंदे गटाने म्हणावा तसा प्रभाव दाखवला नाही. लोकाभिमुख निर्णय घेण्यातही ते कमी पडले. त्यांच्यासोबत निवडणुका लढलो, तर काही खरे नाही. अशी भावना भाजप हायकमांडच्या मनामध्ये तयार झाल्याचे समजते.
COMMENTS