अमरावती। नगर सहयाद्री - अमरावतीमधून एक संतापजनक घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. अमरावतीत १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी आळीपाळीने...
अमरावती। नगर सहयाद्री -
अमरावतीमधून एक संतापजनक घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. अमरावतीत १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी आळीपाळीनेअत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी फिर्यादनुसार तीन नराधमावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून तातडीने तपासाची चक्रे फिरवत तिन्ही आरोपींला गजाआड केले आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, गुरूवारी (२७ एप्रिल) सायंकाळच्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. १२ वर्षीय मुलगी अमरावती जिल्ह्यातील शिरजगावत वास्तव्यास आहे. पीडिता गुरूवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात एकटी गेली होती. यावेळी तिच्या सोबत कुणी नसल्याचं पाहून आरोपींनी तिला वाटतेच अडवल.
पीडितेला धमकावत शेजारी असलेल्या एका शेतात नेत नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या संपूर्ण प्रकाराची माहिती पीडितेने कुटुंबीयांना दिली. कुटूंबानी तात्काळ पीडितेने घेऊन पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तिन्ही नराधममाना गजाआड केले आहेत. या घटनेनं परिसरातून संतापाची लाट उसळली आहे.
COMMENTS