अहमदनगर | नगर सह्याद्री सावेडी उपनगरातील तपोवन रोडवरील समर्थनगरमध्ये असलेले एक बंद घर चोरट्यांनी भरदुपारी फोडले. घरातील सामानाची उचकापाचक क...
अहमदनगर | नगर सह्याद्री
सावेडी उपनगरातील तपोवन रोडवरील समर्थनगरमध्ये असलेले एक बंद घर चोरट्यांनी भरदुपारी फोडले. घरातील सामानाची उचकापाचक करून सुमारे साडे सहा तोळ्याचे सोन्याचे दागिने व ५० हजार रूपये रोख असा तीन लाख सहा हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
नवनाथ आनंदा काळे (वय ३७) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडीचा छडा लावून काही संशयितांना ताब्यात घेतले. बुधवारी सकाळी नवनाथ काळे यांची दोन मुले शाळेत तर पत्नी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या.
नवनाथ घराला कुलूप लावून त्यांच्या पंचर दुकानात गेले होते. दुपारी सव्वा बारा वाजता त्यांचा मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर त्याला घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्याने आईला ही माहिती दिली. त्यानंतर नवनाथही घरी आले. त्यांनी घरात पाहणी केली असता कपाटामध्ये ठेवलेले ५० हजार व सुमारे साडे सहा तोळ्याचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले.
COMMENTS