मनपा कंत्राटी अभियंत्याला मारहाण / बोल्हेगाव उपनगरातील घटना; दोघांवर गुन्हा दाखल अहमदनगर | नगर सह्याद्री महापालिकेच्या पाण्याच्या मुख्य जल...
मनपा कंत्राटी अभियंत्याला मारहाण / बोल्हेगाव उपनगरातील घटना; दोघांवर गुन्हा दाखल
अहमदनगर | नगर सह्याद्री
महापालिकेच्या पाण्याच्या मुख्य जलवाहिनीवर अनाधिकृतपणे घेतलले नळकनेशन तोडल्याच्या रागातून पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी अभियंत्याला शिवीगाळ व दमदाटी करत खड्ड्यात ढकलून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना बोल्हेगाव परिसरातील गणेश चौक येथील गुरुकृपा कॉलनीत मंगळवारी (दि.२५) सायंकाळी ७.१५ च्या सुमारास घडली. दरम्यान आरोपी यांनी प्रभागातील फिटर कैलास महामीने यांना तू नगरचा बाप झाला आहे का? अशी भाषा वापरली.
याबाबत अभियंता निखील सुरेश गायकवाड (रा.डॉनबॉस्को कॉलनी, सावेडी) यांनी रात्री उशिरा तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गायकवाड हे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कंत्राटी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी (दि.२५) सायंकाळी ते गणेश चौकातील गुरुकृपा कॉलनीत कंत्राटी कामगार अक्षय लबडे, सुनील मांजरे यांच्यासमवेत पाण्याची लाईन शिफ्ट करत असताना तेथे भरत पोपट सप्रे (रा.गुरुकृपा कॉलनी, बोल्हेगाव) व त्याचा एक अनोळखी साथीदार असे दोघेजण आले. त्यांनी अभियंता गायकवाड यांना मेन लाईनवर असलेले आमचे पाऊण इंची कनेशन का तोडले? अशी विचारणा करत ते पुन्हा जोडून देण्यास सांगितले.
त्यावेळी अभियंता गायकवाड यांनी मी मेन लाईनवर कनेेशन देवू शकत नाही, उद्या तुम्हाला सब लाईनवर कनेशन जोडून देतो,” असे सांगितले. त्याचा राग येवून सप्रे याने गायकवाड यांना शिवीगाळ केली. ही बाब गायकवाड यांनी प्रभागातील फिटर कैलास महामीने यांना फोन करुन कळविली. त्यावेळी भरत सप्रे याने फोन घेऊन कैलास महामिने यांना तू नगरचा बाप झाला आहे का?” असे म्हणत शिवीगाळ केली तसेच अभियंता गायकवाड यांना खड्ड्यात ढकलून दिले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी कंत्राटी कर्मचार्यांनी अभियंता गायकवाड यांना सप्रे याच्या तावडीतून सोडवले. त्यावेळी सप्रे याने तुझ्याकडे पाहून घेतो, असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे अभियंता गायकवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
COMMENTS