सांगली। नगर सहयाद्री - एका भयानक घटनेने सांगली हादरली आहे. पाठचा सख्खा भाऊच पक्का वैरी झाल्याचं समोर आले आहे. सांगलीच्या कुपवाड येथे कौटुंबि...
सांगली। नगर सहयाद्री -
एका भयानक घटनेने सांगली हादरली आहे. पाठचा सख्खा भाऊच पक्का वैरी झाल्याचं समोर आले आहे. सांगलीच्या कुपवाड येथे कौटुंबिक वादातून लहान भावाने आपल्या मोठ्या डॉक्टर असलेल्या भावावर धारदार शस्त्राने वार करत निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.अनिल बाबाजी शिंदे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. स्थानिक पोलिसांनी आरोपी संपत बाबाजी शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,सकाळच्या सुमारास डॉक्टर अनिल बाबाजी शिंदे हे घरामध्ये बसले होते. अचानकपणे संपत शिंदे हातात घरात आला. यावेळी त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. लहान भाऊ शिव्या देत असल्याने अनिल शिंदे यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी संपत फार रागात होता.रागाच्या भरात लहान भावाने मोठ्या भावावर धारदार शस्रणे कळण्याआधीच सपासर वार केले. अनिल जमिनीवर पडला तो मोठमोठ्याने कळवळू लागला.
पतीचा आवाज येताच पत्नी घरात आली तेव्हा अनिल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे पोहचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस दाखल होत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एका प्रतिष्ठित डॉक्टरांचा खून झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
COMMENTS