विनयभंग, पोस्कोतील आरोपीसाठी मागितली लाच अहमदनगर | नगर सह्याद्री विनयभंग व पोस्को कायद्यांतर्गत झालेल्या अटकेत जामीन लवकर मिळावा यासाठी आठ ...
विनयभंग, पोस्कोतील आरोपीसाठी मागितली लाच
अहमदनगर | नगर सह्याद्री
विनयभंग व पोस्को कायद्यांतर्गत झालेल्या अटकेत जामीन लवकर मिळावा यासाठी आठ हजार रूपये लाचेची मागणी करणार्या महिला पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
४३ वर्षीय पुरूषाने या संदर्भात तक्रार दिली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक (परिविक्षाधीन) ज्योती मच्छिन्द्र डोके (वय-२६) व पोलीस हवालदारसंदीप रावसाहेब खेंगट (वय-४६) अशी आरोपींची नावे आहेत. तक्रादाराच्या मुलाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंग व पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे.
त्यात त्याला लवकर जामीन मिळविण्यासाठी मदत करू व न्यायालयाने म्हणणे मागितल्यावर लवकर देऊ, असे सांगून आठ हजार रूपये लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हवालदार खेंगट यांनी लाचेची रक्कम स्वीकारली. त्यावेळी लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी त्यांना पकडले. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक गायत्री म. जाधव, पोलीस हवालदार चंद्रशेखर मोरे, प्रकाश महाजन, चालक पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे यांनी केली.
COMMENTS