मुंबई | वृत्तसंस्था राज्यात मार्च महिन्यातील अवकाळी पावसामुळे तब्बल १ लाख ९९ हजार ४८६ हेटरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. सगळ्या...
मुंबई | वृत्तसंस्था
राज्यात मार्च महिन्यातील अवकाळी पावसामुळे तब्बल १ लाख ९९ हजार ४८६ हेटरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. सगळ्यात जास्त तोटा मराठवाड्यातल्या शेतकर्यांचा झाला. या भागात ६० हजार २५८ हेटर पिकांवर अवकाळी पावसाने नांगर फिरवला.
यंदा वर्षभर पावसाचे थैमान सुरू आहे. मार्च महिन्यात दोनवेळेस अवकाळी पावसाने झोडपले. ४ ते ९ मार्च आणि १५ ते २१ मार्च काळात पावसासोबत गारपीट झाली. त्यामुळे राज्यातल्या १ लाख ९९ हजार ४८६ हेटरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यात गहू, हरभरा, द्राक्ष, कांदा, स्ट्रॉबेरी, संत्रा पिकांना फटका बसला.अवकाळीचा सर्वाधिक कोप मराठवाड्यावर झाला. मार्च महिन्याच्या १ ते २० तारखेदरम्यान पावसाने मराठवाड्याला झोडपले. त्यात ११ लाख ७ हजार ५ शेतकर्यांच्या ६० हजार २५८ हेटरवरील पिकांचे नुकसान झाले.
मराठवाड्यात सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला. येथील २३ हजार ८२१ हेटरवरील पीक नष्ट झाले. बीड, जालना, लातूरमध्येही मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे झाले. अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने तोंडावर आलेल्या खरिप हंगामाची तयारी कशी करायची, असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा आहे. एप्रिल महिन्यात पुन्हा अवकाळी पावसाची शयता वर्तवली आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात हा पाऊस होईल, असा अंदाज आहे. अनेकांचा गहू काढणीला आला आहे. आंबा पिकाचा बहर आहे. पुन्हा पाऊस झाला, तर शेतकर्यांचे आणखी नुकसान होणार आहे.
COMMENTS