मुंबई। नगर सहयाद्री - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत श्री रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे. त्यांच्याबर...
मुंबई। नगर सहयाद्री -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत श्री रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे. त्यांच्याबरोबर असलेले सर्व मंत्री आणि आमदारांनी देखील रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे. काँग्रेसचे नेते बळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आज राम लल्ला अयोध्येत भेटणार नाही आज तरी तो शेतकऱ्यांकडे आहे, असे म्हणत अयोध्या दौऱ्यावर निशाणा साधला आहे.
राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यांच्या या दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अयोध्येत आज रामलल्ला भेटणार नाही, राम लल्ला आज तरी शेतकऱ्यांकडे आहे. राज्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या रूपात राम लल्लाचे दर्शन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना झाले असते. असे म्हणत अयोध्या दौऱ्यावर निशाणा साधला आहे.
COMMENTS