मुंबई | नगर सहयाद्री टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कलाकार बरखा बिश्त आणि इंद्रनील सेनगुप्ता यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा आहेत. या चर्चांवर अ...
मुंबई | नगर सहयाद्री
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कलाकार बरखा बिश्त आणि इंद्रनील सेनगुप्ता यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा आहेत. या चर्चांवर अद्याप दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र अखेर बरखाने घटस्फोटाच्या वृत्तांना दुजोरा दिला आहे. आयुष्यातील हा सर्वांत कठीण निर्णय असल्याचं तिने म्हटलंय. बरखा आणि इंद्रनीलने २००८ मध्ये लग्न केलं होतं आणि त्यांना एक मुलगीसुद्धा आहे. मीरा असं त्या मुलीचं नाव आहे. होय, आमच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वांत कठीण निर्णय आहे, असं ती म्हणाली. मात्र यावेळी बरखाने त्यांच्या घटस्फोटाचं कारण स्पष्ट केलं नाही. मी सिंगल मदर आहे आणि मीरा ही माझी प्रायोरिटी आहे.
मी सध्या ओटीटीवर चांगले प्रोजेट्स करतेय. मी टेलिव्हिजन आणि चित्रपटातही काम करण्यास उत्सुक आहे, असं बरखाने सांगितलं. एकेकाळी इंद्रनील आणि बरखा यांच्या प्रेमकहाणीची जोरदार चर्चा होती. या दोघांची तगडी फॅन फॉलोईंग आहे. बरखा आणि इंद्रनील यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया जरी आता सुरू झाली असली तरी जुलै २०२१ पासून हे दोघं वेगवेगळे राहत आहेत. लग्नाच्या १५ वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे बरखा ही अभिनेता आशिष शर्माला डेट करत असल्याचीही चर्चा आहे. आशिष शर्मा हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. सिया के राम, रंगरसिया, गुनाहों का देवता, इटर्नल लव्ह यांसारख्या मालिकांमध्ये त्याने काम केलंय. इंद्रनीलने २००४ मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली.
COMMENTS