भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य मुंबई | वृत्तसंस्था- काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरमधील खासदार अमोल कोल्हे भाजपामध्...
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य
मुंबई | वृत्तसंस्था-
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरमधील खासदार अमोल कोल्हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी चुकीचा अर्थ काढू नये, असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, आता भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा अमोल कोल्हेंच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे शिरूरमधील राजकीय समीकरणे बदलणार का, यावर चर्चा सुरू झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी शिंदे गट आणि भाजपमध्ये जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर वक्तव्य केले. ते म्हणाले, सध्या शिंदे गटाकडे ३९ अधिक १० म्हणजे ४९ संख्याबळ आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना तेवढ्यावरच थांबवायचे असा कोणताही विषय कुणाच्याही डोयात नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही तसे म्हणायचे नव्हते.
लोकसभा मार्चमध्ये सुरू होऊन सहा टप्प्यात होणार असेल, तर जानेवारी महिन्यात त्याची चर्चा सुरू होईल. उदाहरणार्थ हातकणंगले किंवा शिरूरसारख्या मतदारसंघांचे काय करायचे असे विषय चर्चेला येतील. गेल्या वेळी शिरूरमधून आढळराव पाटील लढले. त्यांचा तेथे पराभव झाला. समजा तेथील सध्याचे खा. अमोल कोल्हे यांना लोकसभा निवडणुकीच्या चार महिने आधी आपण भाजपात जावे, असे वाटले तर विद्यमान खासदार म्हणून त्यांना उमेदवारी द्यावी लागेल. तसे झाल्यास आढळरावांना समजावलंच जाईल की कोल्हे विद्यमान खासदार आहेत. मात्र कोल्हेंना निर्णय घ्यावा लागेल की त्यांनी एकनाथ शिंदेंकडून निवडणूक लढवायची की भाजपाकडून लढायची?
COMMENTS