अहमदनगर| नगर सहयाद्री- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील वॉर्ड नं. २ मध्ये दोन गटामध्ये तुफान राडा झाल्याची बातमी समोर अली आहे. व्य...
अहमदनगर| नगर सहयाद्री-
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील वॉर्ड नं. २ मध्ये दोन गटामध्ये तुफान राडा झाल्याची बातमी समोर अली आहे. व्यवसायाच्या वादातून दोन गटामध्ये तुफान हाणामारी करत कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. सदर घटनेत तीन ते चार जण जखमी झाले आसून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 मध्ये व्यवसायाच्या वादातून दोन गट आमने-सामने आले. यात दोघा - तिघांना बेदम मारहाण करण्यता आली. यातील एका गटातील एकाने गावठी कट्टा काढत गोळीबार केला. सुदैवाने कुणाला गोळी लागली नसली तरी परिसरातील वातावरण मात्र तणावाचे होते.
घटनेची माहिती कळताच पोलिसांनी फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. दोन्ही गटातील तरूणांची धरपकड सुरू केली. पोलिसांना या प्रकरणी एकास ताब्यात घेतले असून जखमी असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. शहरात काही भागात तणावाचे वातावरण पसरल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
COMMENTS