अहमदनगर| नगर सहयाद्री- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे सालाबादप्रमाणे कालाष्टमीला गुरुवारी (दि.१३) खंडोबा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे....
अहमदनगर| नगर सहयाद्री-
नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे सालाबादप्रमाणे कालाष्टमीला गुरुवारी (दि.१३) खंडोबा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवाचा आनंद सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन खंडेश्वर देवस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.
गेल्या पंधरा वर्षापासून बाबुर्डी ग्रामस्थांच्यावतीने खंडोबा यात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. त्याच प्रमाणे याही वर्षी आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवाच्या निमित्ताने जेजुरी येथून कावडीने पाणी आणले जाते. कवडीने पाणी आणण्यासाठी गावातील युवक मोठ्या प्रमाणात जातात. यात्रेच्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात कावड मिरणूक काढली जाते. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होतात.
संध्याकाळी गावातून गाठीची मिरवणूक काढली जाते. तसेच यात्रेनिमित्त खंडोबा मंदिरात जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महादेव गुरुजी चोभे, बाळासाहेब चोभे, सुधीर चोभे, किसन खेंगट, आजी माजी सरपंच, उपसरपंच, आजी माजी सेवा सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, ग्रामपंचायत सदस्य, खंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रयत्नशील आहेत.
COMMENTS