छत्रपती संभाजीनगर। नगर सहयाद्री - छत्रपती संभाजीनगर येथून एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. उकळलेले पाणी अंगावर पडून जखमी...
छत्रपती संभाजीनगर। नगर सहयाद्री -
छत्रपती संभाजीनगर येथून एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. उकळलेले पाणी अंगावर पडून जखमी झालेल्या चिमुकलीची १५ दिवसाची मृत्यशी झुंज अपयशी ठरली आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रतिभा खंडागळे असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, गुढीपाडव्याच्या दिवशी ही चिमुकली घरात झोपलेली होती. याचवेळी तिची आई शेगडीवर उकळलेले कडक पाणी खाली घेत असतान अचानक कडक पाणी तिच्या अंगावर पडल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तिला प्रथम उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार करून तिला रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती
मात्र पुन्हा तिला अधिक त्रास जाणवु लागल्याने तिला परत घाटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे खंडागळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
COMMENTS