मुंबई। नगर सहयाद्री - कल्याणमधील वाडेघर परिसरामधून धक्कादायक घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे. १५ ते २० तरुणांच्या टोळीने एका तरुणाला राहत्...
मुंबई। नगर सहयाद्री -
कल्याणमधील वाडेघर परिसरामधून धक्कादायक घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे. १५ ते २० तरुणांच्या टोळीने एका तरुणाला राहत्या घरातून अपहरण करत बदम मारहणा केल्याची घटना घडली आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. मयूर शिवदास असे जखमी तरुणाचे नाव आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, मयूर शिवदास हा तरुण आपल्या कुटुंबासह कल्याण पश्चिम वाडेघर परिसरात राहतो. परिसरात राहणाऱ्या काही तरुणांशी बरोबर त्याचे याआधी वाद झाले होते. रविवारी रात्री अचानकपणे मयूर घरात जेवत असताना पंधरा ते वीस तरुण त्याच्या घरात शिरले आणि त्यांनी मयूरला मारहाण करत घराबाहेर उभी केलेल्या गाडीत बसवून नेले.
तलवारीच्या उलट्या बाजूने, हॉकी स्टिक आणि लोखंडी रॉडने बेदम मारहान केली.मारहाणीत मयूरला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धक्कादायक म्हणजे मारहाण करणाऱ्या तरुणांनी आम्ही पोलिसांना हप्ते देतो, त्यामुळे ते आमचे काही वाकडे करणार नाही, अशी धमकी देखील या टोळीने मयूरला दिली. मारहाण करणारे तरुण हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे जखमी मयूर याने सांगितले. या
COMMENTS