अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत द्या पारनेर| नगर सहयाद्री- पारनेर तालुयातील वनकुटे, तास, वडगाव सावताळ, ढवळपुरी, गाजीपुर, खडकवाड...
अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत द्या
पारनेर| नगर सहयाद्री-
पारनेर तालुयातील वनकुटे, तास, वडगाव सावताळ, ढवळपुरी, गाजीपुर, खडकवाडी, पळशी, कामटवाडी वाड्यावर तीन दिवसाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर वादळीवार्यासह गारपीट झाली. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळाली अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी आमदार नीलेश लंके यांच्यासह माजी सरपंच राहुल झावरे, गुरुदत्त मल्टिस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा.ठ.झावरे, जेष्ठ नेते भाऊजी दादा झावरे, बाळासाहेब खिलारी, डॉ. राजु रोडे, डॉ. नितीन रांधवन, डॉ. सुनील गंधे, पळशी सरपंच गणेश मधे, प्रकाश राठोड, भाऊसाहेब चौरे, रामा तराळ यांनी निवेदन दिले.
अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या गारांचा अवकाळी पाऊस वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी तसेच सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई लवकरात लवकर मिळावी. तसेच दिनांक ९ एप्रिल २०२३रोजी अहमदनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व गारपीठ यामुळे हजारो हेटर शेती पिकाचे नुकसान झालेले आहे.
मागील वर्षी सप्टेंबर २०२२ मध्ये ही अहमदनगर जिल्ह्यासह पारनेर तालुयातील काही भागात अवकाळी पाऊस व गारपीटामुळे मोठे नुकसान झाले होते. त्याची नुकसान भरपाई मिळणे अद्याप बाकी असतानाच परत झालेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.
पारनेर-नगर मतदार संघातील वनकुटे, पळशी, खडकवाडी भागात खुप मोठ्या प्रमाणात वादळी वार्यासह गारांचा पाऊस झाल्याने सर्वच शेती पिके, फळबागा व राहत्या घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस रविवारी रात्री या भागात झालेला आहे. यामुळे शेतकर्यांची पिके, फळझाडे तर गेलीच परंतु त्यांचा निवाराही या अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. पारनेर तालुका हा आधीच दुष्काळी, पठारी व अदिवाशी भाग आहे.
मागील वर्षी सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसाने झालेल्या पिकांची नुकसान भरपाई ही अद्याप मिळालेली नसताना त्यातच रविवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य गारांचा पाऊस झाल्याने शेतकर्यांचे शेती पिक, फळबागा व घरांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. तरी मागील वर्षीची नुकसान भरपाई व काल झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ शेतकर्यांना मिळावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
COMMENTS