नवी दिल्ली वृत्तसंस्था- देशात करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. करोनाचा वाढता संसर्ग बघता केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा निर्...
नवी दिल्ली वृत्तसंस्था-
देशात करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. करोनाचा वाढता संसर्ग बघता केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे. आजपासून दोन दिवसांचा मॉक ड्रिल देशातील विविध हॉस्पिटल्स मध्ये घेतला जाणार आहे. या मॉक ड्रिल्स दरम्यान करोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा किती सुसज्ज आहे याचा आढावा घेतला जाणार आहे.
रविवारी गेल्या २४ तासांत देशात ५ हजार ३५७ नवीन रुग्ण आढळले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या ३२ हजार ८१४ वर पोहोचली आहे. शनिवारी ६,१५५ नवीन प्रकरणांची नोंद झाली. गेल्या २४ तासांत केरळमध्ये १ हजार ८०१ नवीन रुग्ण आढळले आहेत. एर्नाकुलम, तिरुअनंतपुरम आणि कोट्टायम जिल्ह्यात वेगाने रुग्ण आढळत आहेत.
देशात दोन दिवसीय करोना मॉकड्रिल
करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अर्लट मोडवर आहे. देशात सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस करोना मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. ही मॉकड्रिल सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये होणार असून यादरम्यान रुग्णालयातील पायाभूत सुविधा, औषधांचा साठा,ऑक्सिजनची उपलब्धता, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या यासह अनेक गोष्टींचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
रुग्णालयातील आयसीयू बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर, मास्क, औषधं, मुबलक कर्मचारी संख्या आणि विविध सामाग्री रुग्णालयात आहे की नाही? याची खात्री केली जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया मॉकड्रिलची पाहणी करण्यासाठी झज्जरच्या एम्स रूग्णालयात उपस्थित राहणार आहेत. तर मुंबईत आज सकाळी ११ वाजता जे. जे. रुग्णालयात, दुपारी १२ वाजता सेंट जॉर्ज रुग्णालय तर दुपारी १ वाजता बॉम्बे रूग्णालयात मॉकड्रील होणार असल्याची माहिती मिळत आहे.
COMMENTS