२६ वर्षीय तरुणीचा ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू बुलढाणा। नगर सहयाद्री- बुलढाणा तालुक्यातील सुंदरखेड येथे दुर्दैवी घटना घडल्याची बातमी समो...
२६ वर्षीय तरुणीचा ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू
बुलढाणा। नगर सहयाद्री-
बुलढाणा तालुक्यातील सुंदरखेड येथे दुर्दैवी घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. नियमितऑफिसला जाणारी तरुणी कामावर पोहोचलीच नाही. काळजीत पडलेल्या घरच्या मंडळींना अचानक मेसेज मिळाला की तुमची मुलगी रेल्वेतून पडून मृत्यू पावली. आधी कुटुंबीयांचा यावर विश्वास बसत नव्हता. परंतु सत्य समोर आल्यावर कुटुंबीयांवर दुःखांचा डोंगर कोसळला. पूर्णिमा दिनकर इंगळे (वय वर्ष २६) असे मृत तरुणीचे नाव आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, बुलढाणा तालुक्यातील येथील २६ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. बेपत्ता तरुणी पूर्णिमा दिनकर इंगळे बुलढाणा येथील सखी वन स्टॉप या कार्यालयात पॅरामेडिकल विभागात कार्यरत होती.ऑफिसला जात आहे असे सांगून गुरुवारी सकाळी घरातून निघाली, मात्र कामाच्या ठिकाणी पोहोचली नाही.
भुसावळ जीआरपीकडून बुलढाणा शहर पोलिसांना माहिती देण्यात आली की एका तरुणीचा मृतदेह भुसावळ–जळगावच्या दरम्यान पाळधी रेल्वे स्टेशन जवळ मिळून आला असून सदर तरुणीचे नाव पूर्णिमा इंगळे आहे. मृतकाजवळ मलकापूर ते जळगाव प्रवासाचे तिकीट आढळून आले व ती गीतांजली एक्सप्रेसने प्रवास करीत असताना खाली पडल्याची माहिती भुसावळ जीआरपीचे पीआय गिरडे यांनी दिली.
COMMENTS