नवी दिल्ली वृत्तसंस्था- कौटुंबिक वादातून दोन जीवांचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. एका विवाहित तरुणाने पत्नीसोबत झालेल्या वादातून टोकाचे पाऊल...
नवी दिल्ली वृत्तसंस्था-
कौटुंबिक वादातून दोन जीवांचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. एका विवाहित तरुणाने पत्नीसोबत झालेल्या वादातून टोकाचे पाऊल गाठले. कौटुंबिक वादामध्ये आरोपी पतीने रागाच्या भरात पत्नीची आणि 8 वर्षाच्या मुलाची हत्या केली. रात्री हत्या केल्यानंतर सकाळी आरोपीने स्वतः पोलीस ठाणे गाठले आणि या हत्याकांडाची कबुली दिली.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, हरियाणा राज्यातील सोनीपत जिल्ह्यामधील गोपालपूर गावात आरोपी पती, पत्नी आणि मुलासह राहत होता. चारचोघांसारखा दोघांचा संसार अगदी सुखात चालला होता. मात्र त्यांच्या या सुखी संसाराला नजर लागली आणि त्यांच्या संसारात कुरबुरी सुरु झाल्या. या कुरबुरी इतक्या वाढल्या की, त्यांच्यात दररोज भांडण होऊ लागले अन् अखेर हे भांडण विकोपाला जाऊन नको ते होऊन बसले.
या दाम्पत्यामध्ये दररोज या-ना-त्या कारणावरून वाद व्हायचे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमाराला पतीच पत्नीसोबत जोरदार भांडण झाले. रोजच्या कटकटीला कंटाळून अखेर शुक्रवारी मध्यरात्री पत्नीला कायमचे संपवण्याचा विचार पतीच्या डोक्यात आला. याच क्रूर विचारातून त्याने पत्नीसह मुलाला कायमचे संपवले.
हत्येनंतर दोघांचेही मृतदेह रात्रभर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. तसेच आरोपी पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
COMMENTS