छत्रपती संभाजीनगर नुकतीच महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पार पडली. महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते.मात्र ही सभा एका वेगळ्याच कारणा...
छत्रपती संभाजीनगर
नुकतीच महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पार पडली. महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते.मात्र ही सभा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली, सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दाडी मारली. नाना पटोले सभेला गैरहजर असल्याने चर्चेला उधाण आले होते. १६ तारखेला महाविकास आघाडीची नागपूरला सभा आहे. तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष गुवाहाटीला पाहण्यास मिळतील. जबाबदारीने हे वक्तव्य करतोय,” असे आशीष देशमुख यांनी सांगितले आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,अखेर नाना पटोले यांनी या सर्व गोष्टींवर मौन सोडत आपली भमिका मंडळी. “मला दिल्लीत बोलावण्यात आले होते. दिल्लीत आमच्या सूरतच्या दौऱ्याचे नियोजन करायचे होते, म्हणून दिल्लीला होतो. माझी प्रकृती बरी नसल्याचे माध्यमांत सांगण्यात आले. पण, माझी प्रकृती चांगली आहे. माझ्यामुळे दुसऱ्याची प्रकृती खराब होते,” असे नाना पटोलेंनी म्हटले.
काँग्रेस नेते आशीष देशमुख यांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. “महिन्याचा एक खोका नाना पटोलेंना मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष कधी नवीन सरकारच्या प्रमुखांवर बोलताना दिसत नाहीत, पण उपमुख्यमंत्री आणि भाजपाच्या विरोधात बोलताना सातत्याने दिसतात. याच्यामागे तो खोका कारणीभूत आहे का? अशी चर्चा मुंबईत केली जात आहे. ” असे आशीष देशमुखांनी म्हटले आहे.
“नाना पटोले ‘वज्रमूठ’ सभेत गैरहजर होते. त्यानंतर ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, मला मिळालेल्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्ष सूरतच्या मार्गावर होते. सूरतच्या मार्गावर कोण असते, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. १६ तारखेला महाविकास आघाडीची नागपूरला सभा आहे. तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष गुवाहाटीला पाहण्यास मिळतील. जबाबदारीने हे वक्तव्य करतोय,” असे आशीष देशमुख यांनी सांगितले आहे.
COMMENTS