नवी दिल्ली वृत्तसंस्था- केरळमध्ये धावत्या ट्रेनमधील एक थरारक घटना समोर आली आहे. कोझिकोड जिल्ह्यातील इलाथूर येथील एका अज्ञात व्यक्तीने महिलेच...
केरळमध्ये धावत्या ट्रेनमधील एक थरारक घटना समोर आली आहे. कोझिकोड जिल्ह्यातील इलाथूर येथील एका अज्ञात व्यक्तीने महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून चालत्या ट्रेनमध्येच पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यात एका माय-लेकाचा समावेश आहे. एलाथुर येथील रेल्वे रुळांजवळ दोन मृतदेह सापडले असून या घटनेत आठ जण गंभीर जखमी आहेत.
मिळाले्ल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये चढण्यावरुन दोन व्यक्तींमध्ये भांडण झालं होतं. बसायला सीट मिळाली नाही म्हणून आरोपीचं महिलेसोबत वाद झाला होता. यावेळी महिलेच्या बाजूने काही प्रवाशांनीही आरोपीसोबत वाद घातला. यामुळं संतापलेल्या आरोपीने महिलेच्या अंगावर पेट्रोल शिंपडून आग लावली. ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, लाल शर्ट घातलेल्या व्यक्तीने महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकले व नंतर माचिसने पेटवून दिलं. त्यामुळं संपूर्ण ट्रेनचा डब्ब्यात आग लागली. यात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्रवाशांना आपतकालीन साखळी खेचून ट्रेन थांबवली. मात्र, त्याचवेळी ट्रेनचा वेग कमी झाल्याचे पाहून आरोपीने ट्रेनमधून पळ काढला. नंतर आरपीएफने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यात आली. तर जखमींना रुग्णालात दाखल केले. काही प्रवाशांनी तीन जण बेपत्ता असल्याचं सांगितले. त्यानंतर शहर पोलिसांनी रुळांची पाहणी केली असता तिथे मृतदेह पडलेले सापडले. एक महिला व लहान मुलांचा मृतदेह असून एका अज्ञात पुरुषाचा मृतदेहही पोलिसांना सापडला.
COMMENTS