मुंबई नगर सहयाद्री : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. त्याने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या घ...
मुंबई नगर सहयाद्री :
लोकप्रिय मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. त्याने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या घरातील अनेक गोष्टी सांगितल्या. नुकताच प्रर्दशित झालेल्या वेड या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलेच वेड लावलं. हा चित्रपट रितेशने पहिलादाच दिग्दर्शन केलं. यानिमित्ताने रितेश देशमुखने दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या कुटूंबाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. यात त्याने आपल्या भाऊबद्दल महत्त्वचा खुलासा केला. त्या मुलाखतीत एका प्रश्न विचारण्यात आला कि तुझ्या घरात तुझे सर्वात मोठे टीकाकार कोण आहेत यावर त्याने हटके उत्तर देत सांगितले कि माझ्या घरात माझे सर्वात मोठे टीकाकार माझे भाऊ आहेत रितेश नेहमी आपल्या भावांसोबतचे फोटो शेर करत असतो. रितेशला धीरज आणि अमित हे दोन भाऊ आहेत . हे त्याचे सर्वात मोठे टीकाकार आहेत कारण त्यांनी त्याचा कोणत्याच चित्रपटाला चांगले म्हटले नाही. तरी पण ते दोघे माझ्यासाठी
महत्वाचे आहेत. त्यांना माझं आतापर्यंतचं कोणतंही काम आवडलेलं नाही. 'वेड' हा पहिलाच चित्रपट आहे जो अमित भैय्यांना आवडला आणि त्यांनी माझं कौतुक केलं. त्यानंतर मी थेट सिद्धिविनायकाला गेलो होतो. धीरज कायमच मला पाठिंबा देत असतो. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. पण त्यासोबतच अमित भैय्या हे कायमच मला मार्गदर्शन करतात.
COMMENTS