श्रीगोंदा | नगर सह्याद्री श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडी झाली आहे. तर या निवडणुकीत ...
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडी झाली आहे. तर या निवडणुकीत पाचपुते - नागवडे हे भाजप काँग्रेसच्या एकीने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. माजी आमदार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादीचा एकला चलो रे चा नारा दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे.
श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडी झाली आहे. तर या निवडणुकीत पाचपुते - नागवडे हे भाजप काँग्रेसच्या एकीने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. माजी आमदार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादीचा एकला चलो रे चा नारा दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे.
श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २८ एप्रिल ला होत असून तालुयांतील राजकीय वातावरण गरमागरम झाले आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. छाननी होऊन अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत २० एप्रिल पर्यंत आहे. ही निवडणुक पाचपुते नागवडे यांनी अत्यंत महत्वाची आणि चुरशीची केली आहे. तर माजी आमदार राहुल जगताप व राज्य बाजार समिती चे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी विशेष लक्ष घातले असल्याने त्यांनी राष्ट्रवादीचा स्वतंत्र पॅनल उभा केला असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे.
मागील २ महिन्यापूर्वी खरेदी विक्री संघाची निवडणूक झाली या निवडणुकीत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. यामध्ये नागवडे व भोस यांचा एक एक उमेदवार पराभूत झाले असल्याने आणि राहुल जगताप यांचे दोन उमेदवार बिनविरोध झाले होते. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत जगताप यांना बाजूला ठेऊन पाचपुते नागवडे यांनी अतिशय सावध भुमिका घेत एकत्र निवडणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. जागा वाटपाचे काही ठरले नसल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात मात्र बाजार समितीच्या १८ जागा आसल्याने भाजपा ९ जागा आणि काँगेस ९ जागा अश्या लढतील. तर राहुल जगताप यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून पॅनल स्वतंत्र करण्यात आला आहे.
राहुल जगताप यांनी राजकारणात झपाट्याने मोठया प्रमाणात प्रगती केली आहे. म्हणजे तालुयांतील तरुण तरुणाई ला जवळ करण्यात यशसवी झाले आहेत. तालुयातील सर्वच भागात नेटवर्क तयार केल्याचे दिसून येते. मागील सात आठ महिन्यांपूर्वी झालेला सेवा सस्थेच्या आणि ग्रामपंचायत निवडणूकीत बहुतांशी संस्थामध्ये जगताप यांचे वर्चस्व असल्याचे दिसते तर ग्रामपंचायता ही बर्याच त्यांच्याच ताब्यात दिसते तसेच जगताप यांच्या मदतीला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, काष्टी गावचे सरपंच साजन पाचपुते व बाळासाहेब नाहटा असल्याने बाजार समिती राहुल जगताप यांचाच झेंडा फडकेल असे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. तर दुसरीकडे पाचपुते नागवडे हे एकत्रित निवडणुक लढत असल्याने दोंघाच्या ताब्यात किती सेवा सस्था व ग्रामपंचायती आहेत यावर अवलंबून आहे. उमेदवारी देताना पाचपुते व नागवडे यांची मोठी डोके दुखी होणार असल्याचे बोलले जाते.
श्रीगोंदे बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार राहुल जगताप यांनी हिरव्या पट्ट्यातील नेते केशव मगर आणि त्यांचे पुतणे जितेंद्र मगर यांची भेट घेऊन जितेंद्र मगर यांना उमेदवारी करण्या बाबत सविस्तर चर्चा केली आहे. तर केशव मगर यांचे चिरजीव योगेश मगर यांनी आमदार बबनराव पाचपुते यांच्या कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण पाचपुते-नागवडे यांचा एकत्रित पॅनल असल्याने केशव मगर यांनी नागवडे कारखाना निवडणूकीत राजेंद्र नागवडे यांना टोकाचा विरोध केला असल्याने आमदार पाचपुते यांच्या बाजूने उमेदवारी करण्यास अनुकूल नसून जगताप यांच्या पॅनलमध्ये उमेदवारी करण्यास इ्छुक आहेत.
सन २०२४ च्या विधान सभेसाठी आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबातील एक जण, माजी आमदार राहुल जगताप व महिला काँग्रस पक्षाच्या जिल्हा अध्यक्षा अनुराधा नागवडे हे निडणुकीसाठी तयारी करत आहेत. माजी आमदार राहुल जगताप व त्यांची पत्नी डॉ. प्रनोती जगताप यांनी लग्न सोहळे, दशक्रिया विधी, वर्षश्राद्ध त्याच प्रमाणे सुख दुःखात भेटी गाठी तालुयातील सर्व गण, गट पिजून काढले असून तशी तयारी सुरू केली आहे. त्याच प्रमाणे आमदार पाचपुते कुटुंबातील प्रतापसिह पाचपुते, डॉ. प्रतिभा पाचपुते कार्यक्रमात सहभागी असतात परंतू नागवडे यांच्या भेटीगाठी कमी प्रमाणात दिसून येतात. त्यातच बाजार समितीच्या निवडणुकीत पाचपुते आणि नागवडे हे एकत्रित लढत असल्याने विधानसभा निवडणुकीत पाचपुते, नागवडे यांच्या पैकी कुणाचा फायदा अथवा कुणाचा तोटा होईल त्या निवडणुकीत समजेल.
COMMENTS