मीडिया वृत्तानुसार अयानने त्याच्या दिग्दर्शनाची फी म्हणून ३२ कोटी रुपयांचा करार केला आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
बॉलिवूड चित्रपट निर्माता अयान मुखर्जी सध्या त्याच्या आगामी 'वॉर 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाशिवाय त्याचे चाहते 'ब्रह्मास्त्र'च्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. हृतिक रोशन स्टारर चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी अयानने मोठी रक्कम आकारली आहे
मीडिया वृत्तानुसार अयानने त्याच्या दिग्दर्शनाची फी म्हणून ३२ कोटी रुपयांचा करार केला आहे. चित्रपटाचे निर्माते या महिन्यात प्री-प्रॉडक्शनवर काम सुरू करतील आणि यावर्षी नोव्हेंबरपर्यंत शूटिंग सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे. 'वॉर २ मध्ये हृतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि २०२४ च्या उत्तरार्धात किंवा २०२५ च्या सुरुवातीला रिलीज होणार आहे. 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वॉर', 'पठाण' आणि 'टायगर ३' यांसारख्या चित्रपटांचा समावेश असलेला यशराज फिल्म्स बॅनरखाली बनवण्यात येणारा हा गुप्तचर जगतातील सहावा चित्रपट असेल. याशिवाय शाहरुख आणि सलमान खान स्टारर 'टायगर जिंदा है पठाण या चित्रपटावरही काम सुरू आहे.
एका मीडिया वृत्तामध्ये असा दावा करण्यात आला होता की, करण जोहरची इच्छा होती की अयानने आधी 'ब्रह्मास्त्र' आणि नंतर 'वॉर २'चा सिक्वेल सुरू करावा. अयानने 'ब्रह्मास्त्र' सोडून 'वॉर २' मध्ये काम केल्याने करण खरोखरच निराश झाला आहे. खरे तर अयानने 'ब्रह्मास्त्र'चा सिक्वेल आधी पूर्ण करावा आणि नंतर दुसरा प्रोजेक्ट हाती घ्यावा, अशी त्याची इच्छा आहे. करणने या चित्रपटासाठी १०० कोटी रुपये आणि आठ वर्षांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे.
COMMENTS