झाशी । नगर सह्याद्री - यूपी एसटीएफने माफिया डॉन अतिक अहमदचा मुलगा असद याचा झाशीत एन्काउंटर झाला आहे. हे एन्काउंटर झाशीमध्ये झाले. 24 फेब्रु...
झाशी । नगर सह्याद्री -
यूपी एसटीएफने माफिया डॉन अतिक अहमदचा मुलगा असद याचा झाशीत एन्काउंटर झाला आहे. हे एन्काउंटर झाशीमध्ये झाले. 24 फेब्रुवारी रोजी उमेश पालची हत्या केल्यापासून तो फरार झाला होता. पोलिस सतत त्यांचा शोध घेत होते आणि झाशी येथे त्यांचे लोकेशन मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांचे एन्काउंटर केले.
यूपी एसटीएफच्या म्हणण्यानुसार, माफियातून राजकारणी झालेला अतिक अहमद यांचा मुलगा असद आणि गुलामचा मुलगा मकसूदन हे दोघेही प्रयागराजच्या उमेश पाल हत्याकांडात फरार होते. त्यांच्यावर प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस होते. झाशी येथे ही चकमक झाली असून त्यांच्याकडून विदेशी बनावटीची अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहे.
उमेश पाल बसपा आमदार राजू पाल यांच्या खून प्रकरणातील साक्षीदार होते. 24 फेब्रुवारीला न्यायालयातून घरी परतत असताना त्यांच्या घरासमोर हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी अनेक गोळ्या उमेश पाल यांच्यावर झाडल्या.
तसेच हल्लेखोरांनी बॉम्ब हल्लाही केला होता. ज्यात उमेश पाल आणि त्यांच्या सुरक्षेसाठी असलेला पोलीस कर्मचारी संदीप निषाद यांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एक पोलीस कर्मचारी राघवेंद्र गंभीर जखमी झाले होते, त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Asad, son of mafia-turned-politician Atiq Ahmed and Ghulam S/o Maksudan, both wanted in Umesh Pal murder case of Prayagraj and carrying a reward of Rupees five lakhs each; killed in encounter with the UPSTF team led by DySP Navendu and DySP Vimal at Jhansi. Sophisticated foreign… pic.twitter.com/dAIS6iMM3G
— ANI (@ANI) April 13, 2023
COMMENTS