अहमदनगर | नगर सह्याद्री केंद्र सरकारच्या वतीने नगर शहराला पाणीपुरवठा करणार्या अमृत पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या ’मे’ महि...
अहमदनगर | नगर सह्याद्री
केंद्र सरकारच्या वतीने नगर शहराला पाणीपुरवठा करणार्या अमृत पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या ’मे’ महिन्या अखेर ही सर्व कामे पूर्ण होऊन दररोज नियोजनबद्ध पाणीपुरवठा केला जाईल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे.
विळद पंपिंग हाऊस येथे अमृत पाणी योजनेचे पंप व मोटार बसवण्याच्या कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, मनपा सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, जल अभियंता परिमल निकम आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप पुढे म्हणाले की, नगर शहराला पाणीपुरवठा करणारी पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम मुळा धरण पंपिंग हाऊस ते विळद पंपिंग हाऊस यादरम्यान ११०० एमएम व्यासाची पाईपलाईन टाकून झाली आहे. याचबरोबर विळद पंपिंग हाऊस ते वसंत टेकडी पर्यंत ११०० एमएम व्यासाची नवीन पाईपलाईन टाकून झाली आहे. वसंत टेकडी येथे ५० लाख लिटर क्षमतेच्या टाकीचे काम पूर्ण झाले आहे. याचबरोबर विळद जलशुद्धीकरण केंद्र येथे नवीन ४५ दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे.
विळद येथे पंप व मोटार बसवण्याचे काम अपूर्ण होते आता हे काम प्रगतीपथावर आले असून ६०० एचपीचे तीन पंप बसवण्यात आले आहेत. याचबरोबर ६०० एचपीचे तीन मोटर बसवण्याचे काम सुरू आहे. पॅनल, स्टार्टर, सबस्टेशन उभारण्यात आले असून ही सर्व कामे मे महिना अखेर पूर्ण होतील व नगर शहराला नियोजनबद्ध दररोज पाणीपुरवठा कसा करता येईल यासाठी उपाययोजना केल्या जातील. नगर शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्था याचबरोबर फेज टू पाण्याच्या टाया व पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा केला जाईल, असे ते म्हणाले. यावेळी जल अभियंता परिमल निकम यांनी योजनेची माहिती दिली.
COMMENTS