अहमदनगर | नगर सह्याद्री - विजेची दरवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांच्या नेतृत...
अहमदनगर | नगर सह्याद्री -
विजेची दरवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, दत्ता जाधव, योगिराज गाडे, अमोल येवले, संतोष गेनप्पा, संदिप दातरंगे, संजय सागावकर, डॉ.श्रीकांत चेमटे, अरुण झेंडे, गौरव ढोणे, संतोष धुमाळ, दिपक भोसले, शरद कोके, पंकज राठोड, नरेश भालेराव, सुनिल भोसले, अक्षय नागापुरे, जालिंदर वाघ, महेश शेळके आदिंसह शिवसैनिक, युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात एककिडे उन्हाचा पारा वाढत असताना राज्याला वीज पुरवठा करणार्या वीज वितरण कंपन्यांनी आपल्या वीज दरात भरमसाठ वाढ करून जनतेला ऐन उन्हाळ्यात शॉक दिला आहे. मुंबईला वीज पुरवठा करणार्या बेस्ट, टाटा आणि अदानी पॉवर या वीज वितरण कंपन्यांनी आपल्या वीज दरात वाढ केली आहे. या तीन कंपन्यांपाठोपाठ उर्वरित महाराष्ट्राला वीज पुरवणारी महावितरण या कंपनीने देखील वीज दरवाढ करण्याच्या निर्णय घेऊन ग्राहकांना झटका दिला आहे. वीज दरवाढीचा फटका शेतकर्यांना तसेच छोट्या आणि मोठ्या उद्योगांना बसणार आहे. आधीच महागाईने होरपळलेल्या राज्यातील जनतेसाठी ही दरवाढ म्हणजे दुष्काळात तेरावा महिना..... अशीच आहे.
राज्यातील जनता या वीज दरवाढीने त्रस्त होणार आहे. अन्य राज्यात विजेचे दर नियंत्रणात आहे. शिवाय त्या राज्यात अखंड २४ तास वीज पुरवली जाते. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात मात्र अजूनही भार नियमन केले जाते. शिवाय अधूनमधून अशा वीज दरवाढीचा शॉकही जनतेला दिला जातो.ही निषेधार्थ बाब असल्याचे राठोड म्हणाले.महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या वतीने नगर शहराचे जिल्ह्याला वीजपुरवठा करण्यात येतो. आज अनेक भागांमध्ये परस्परित्या विजेचा खेळ खंडोबा झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये कमी व उच्च दाब वीज मिळत असल्यामुळे तेथे सुद्धा उद्योजकांचे तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. या नुकसानीमुळे त्या नागरिकांना अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची मदत मिळू शकलेली नाही. सर्वसामान्यांना विजेचा मोठा फटका बसलेला आहे. जे नेहमीचे बिल आहे. यामध्ये सुमारे १७ टक्क्याने वाढ करण्यात आलेली आहे. ही अतिशय भयावक परिस्थितीची वाढ असून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका आता बसू लागलेला आहे. याबाबत काही सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात दिला आहे.
COMMENTS