दत्ता सप्रे | बोल्हेगाव परिसरातील गणेश चौक ते केशव कॉर्नर पर्यंत रस्ता कामातील पाईपलाईन तातडीने स्थलांतरित करा अहमदनगर | नगर सह्याद्री - मह...
दत्ता सप्रे | बोल्हेगाव परिसरातील गणेश चौक ते केशव कॉर्नर पर्यंत रस्ता कामातील पाईपलाईन तातडीने स्थलांतरित करा
अहमदनगर | नगर सह्याद्री -
महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व उदासीनपणामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. याबाबत माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे यांनी महापालिका आयुक्त पंकज जावळे यांना निवेदन दिले आहे.
प्रभाग क्रमांक ७ मधील बोल्हेगाव परिसरातील गणेश चौक ते केशव कॉर्नर पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी आम्ही पाठपुरावा करून मोठा निधी उपलब्ध करून दिला. अनेक वर्षानंतर या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळाला आणि काम सुरू झाले. या कामांमध्ये पिण्याच्या पाण्याची मुख्य लाईन असल्यामुळे ही लाईन स्थलांतरित करण्याचे ठरले. प्रशासनाकडे पाठपुरावा केला मात्र ही लाईन वेळेवर स्थलांतरित होऊ न शकल्यामुळे रस्ता काँक्रिटीकरणाचे काम बंद पडले. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणा व उदासीन पणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाईपलाईन स्थलांतरित करायची असल्यामुळे रस्त्याचे काम थांबवण्यात आले आहे. त्यामुळे मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे खोदलेल्या रस्त्यामध्ये तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांचा दळणवळणाचा संपर्क तुटला आहे. यामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे जर सुचविलेली कामे वेळेवर होत नसतील तर आम्ही नगरसेवक पदाचे राजीनामे देतो अशी तीव्र भावना आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्याकडे माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे, नगरसेवक अशोक बडे, व भालचंद्र भाकरे यांनी व्यक्त केली.
पावसाळ्याचे दिवस जवळ येत असून रस्त्यामधील पाईपलाईन स्थलांतरित काम तातडीने मार्गी लावून गणेश चौक ते केशव कॉर्नर पर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरणाचे काम तातडीने मार्गी लावणे गरजेचे आहे, नागरिक तीव्र स्वरूपाच्या भावना व्यक्त करत आहे. बोल्हेगाव नागपूर परिसरातील नागरिकांना फेज टू पाणी योजनेद्वारे पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे परंतु नियोजनाच्या अभावामुळे प्रभागातील प्रश्न मार्गी लागण्यास उशीर होत आहे. या कामासाठी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी लक्ष घालून प्रभाग क्रमांक ७ मधील प्रश्न मार्गी लावावे तसेच गणेश चौक ते केशव कॉर्नर पर्यंतच्या पाईपलाईन व रस्ता काँक्रिटीकरणाचे काम तातडीने मार्गी लावणे गरजेचे आहे असे माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे म्हणाले.
COMMENTS