अहमदनगर | नगर सह्याद्री नगरमधील गजराजनगर, मुकुंदनगरमधील वाहने तोडफोडीची घटना ताजी असतानाच बुर्हाणनगर, नागरदेवळे रोडवर दोन दुचाकी वाहनांचे...
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगरमधील गजराजनगर, मुकुंदनगरमधील वाहने तोडफोडीची घटना ताजी असतानाच बुर्हाणनगर, नागरदेवळे रोडवर दोन दुचाकी वाहनांचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. नागरदेवळे रोडवर उभे असताना अज्ञात ७ ते ८ इसमांनी दुचाकी वाहनाचे नुकसान केल्याची तक्रार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
या संदर्भात नागरदेवळे येथील शोएब हमीद सय्यद यांनी फिर्याद दिली असुन त्यात म्हटले आहे की, रोडवर चर्चा करीत उभे असताना उज्ञात आरोपिंनी त्यांच्या व साक्षीदाराच्या दुचाकींचे नुकसान केले. त्यामागील कारणही कळलेले नाही. पोलीसांनी अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. गजराज नगर येथे मंगळवारी अशाच स्वरुपात गाड्यांची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली होती.
संभाजीनगर महामार्गावरील हॉटेल इंद्रायणी जवळ तुफान दगडफेक झाल्याने या परीसरात तणावाचे वातावरण असताना आणखी गाड्यांचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. लागोपाठ घडणार्या अशा घटनांमुळे संशयाचे वातावरण तयार झाले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक एन.आय.शेख करीत आहेत. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
COMMENTS