अहमदनगर /नगर सहयाद्री : अहमदनगर जिल्यातील कर्जत - जामखेड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आपल्या राजकारणातील भूमिकांम...
अहमदनगर /नगर सहयाद्री :
अहमदनगर जिल्यातील कर्जत - जामखेड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आपल्या राजकारणातील भूमिकांमुळे चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी एका युटयूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत एक प्रश्न विचारण्यात आला होता. आपल्याला कोणती अभिनेत्री जास्त आवडते त्यावेळी आ. रोहित पवार यांनी उत्तर दिले कि माझी आवडती अभिनेत्री ही आलिया भट्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. रोहित पवार आपल्या दिलखुलास गप्पामुळे नेहमीच चर्चेत असतात. मुलाखतीत दिलेल्या प्रश्ननाने अनेकांचे लक्ष वेधले. त्यानंतर त्यांना विचारण्यात आले का तुम्ही कधी आलिया भट्ट ला भेटला आहात का? यावर त्यांनी उत्तर दिले कि नाही, मी कधीच आलिया भट्टला भेटलो नाही. तुम्हाला जर आलिया भट्ट आवडते, याचा जर विरोधकांनी राजकारणासाठी वापर केला तर यावेळी रोहित पवार म्हणाले, त्यांनी याचा वापर तर करून बघुद्या तर त्यांना काय उत्तर द्यायचे ते मी बघेल. यावेळी त्यांनी राजकारणातील प्रवासाबद्दल ही गप्पा देखील मारल्या. या मुलाखतीत अनेक प्रश्न विचारण्यात आले त्याला आपल्या खास स्टाइलमध्ये उत्तर दिले
COMMENTS