अहमदनगर | नगर सह्याद्री नालेगाव अमरधाम येथे दशक्रिया व मुंडन विधीसाठी शेड व ओटाची आवश्यकता होती. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ही कामे सुर...
अहमदनगर | नगर सह्याद्रीनालेगाव अमरधाम येथे दशक्रिया व मुंडन विधीसाठी शेड व ओटाची आवश्यकता होती. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ही कामे सुरू आहे. दशक्रिया विधी करण्यासाठी नागरिकांना विविध अडचणीला सामोरे जावे लागत असे. आता ही कामे लवकरच पूर्ण होतील, टप्प्याटप्प्याने एक एक प्रश्न नालेगाव अमरधाम मधील मार्गी लावले जातील. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून या ठिकाणी अत्यावश्यक विविध कामे मार्गी लागली आहे अशी माहिती उपमहापौर गणेश भोसले यांनी दिली.
नालेगाव अमरधाम येथे उपमहापौर गणेश भोसले यांच्या प्रयत्नातून दशक्रिया मुंडन विधीसाठी लागणारे ओटा व शेड कामाची पाहणी केली. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, अहमदनगर जिल्हा सलून चालक-मालक असोसिएशनचे अध्यक्ष जनार्दन वाघ, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे शहराध्यक्ष विशाल मदने, संतोष भोसले, अजय भोसले, सोनू भोसले, विशाल सुपेकर, सुनील फुलसौंदर, दत्तात्रय पडोळे, पप्पू सुपेकर आदी उपस्थित होते.v
COMMENTS