उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका फॅशन डिझायनरने आत्महत्या केली. मुरादाबाद येथील निवासी घरात त्यांच्या बेडरूममध्ये संशयास्पद स्थितीत त्यांचा मृतदेह
मुंबई / नगर सह्याद्री -
उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका फॅशन डिझायनरने आत्महत्या केली. मुरादाबाद येथील निवासी घरात त्यांच्या बेडरूममध्ये संशयास्पद स्थितीत त्यांचा मृतदेह आढळून आला, तिच्या आत्महत्येने चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
मुरादाबादच्या ठाणे सिव्हिल लाईन्स भागातील रामगंगा विहार कॉलनीत राहणारी २५ वर्षीय फॅशन डिझायनर मुस्कान नारंग गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून मुस्कान नारंग होळीच्या दिवशी मुंबईहून मुरादाबादला आली होती, त्यानंतर ती परतली नाही, असे तिच्या वडिलांनी सांगितले.
मुस्कानचे वडील चंद्र प्रकाश नारंग यांनी सांगितले की, मुंबईहून मुरादाबादला परतल्यानंतर तिची वागणूक खूपच अस्वस्थ होती. रात्री आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केले, त्यानंतर ती खोलीत झोपायला गेली, शुक्रवारी सकाळी जेव्हा मुस्कानच्या खोलीचा दरवाजा बराच वेळ उघडला नाही तेव्हा घरातील लोक बराच वेळ मुस्कानला बाहेरून हाक मारत राहिले बाहेरून मुस्कानला फोन करत होते. काहीच उत्तर न आल्याने कुटुंबीयांनी घाबरून खिडकीतून आत डोकावले असता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
COMMENTS