कान्हूर पठार | नगर सह्याद्री: पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या येथील संपुर्ण महारास्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या दर्याबाई, वेल्हाबाई व भैरवनाथ...
कान्हूर पठार | नगर सह्याद्री:
पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या येथील संपुर्ण महारास्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या दर्याबाई, वेल्हाबाई व भैरवनाथांचा वार्षिक यात्रोत्सव दि.७ व ८ एप्रिल रोजी साजरा होत आहे.
वडगाव दर्या येथे खोल अशा दरीत दर्याबाई, वेल्हाबाईचे मंदीर आहे. मंदीरासमारच खोल दरी असुन त्यात बाराही महिने पाणी असते. येथील माकडे सुध्दा खुप प्रसिध्द आहेत.येणार्या भाविकांकडून पुटाणे, शेंगदाणे घेण्यासाठी माकडांची लगबग सुरु असते. भाविकांना त्यांनी इजा केल्याचे मात्र ऐकीवात नाही. दर्याबाई, वेल्हाबाईचे मंदीर सुध्दा खुपच वैशिष्ट्यपर्ण आहे. या मंदीरात वर्षाचे बाराही महिने छतामधुन पाणी थेंबथेंब पडत राहते. या पाण्याच्या थेंबामुळे मंदीरातील खडकावर मोठे खड्डे तयार झालेले पहायला मिळतात.
मंदीराचे आणखी एक वैशिषट्य म्हणजे मंदीराच्या छतावरुन खाली जमिनीच्या दिशेने येणारे लवणस्तंभ. निघोजला जसे नदीमध्ये रांजणखळगे तयार झाले आहेत तसे येथे लवणस्तंभ तयार झाले आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासुन स्तंभ तयार होण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुुरु आहे.चैत्र शुद्ध अष्टमीला जगदंबेला हळद लागली आहे. शुक्रवार दि. ७ एप्रिलला सकाळी गावातून मंदिरापर्यंत गावकरी व भक्तगण देवीला मांडवडहाळे घेऊन जातील. त्याच दिवशी संध्याकाळी परंपरेनुसार देवीचा छबिना व काठी मिरवणुक होईल.
शोभेच्या दारुच्या आतिषबाजीमधे व पारंपरिक वाद्द्यांच्या गजरात गावातून मंदिरा पर्यंत वाजतगाजत मिरवणुक पार पडेल. छबिना मंदिरात पोहोचल्यानंतर भाविकांच्या मनोरंजनासाठी प्रकाश आहिरे व निलेश कुमार आहिरे यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. दि. ८ एप्रिल रोजी मंदिर परिसारात संपुर्ण गावातील व परिसरातील भाविकांच्या सवाष्ण भोजनाचा कार्यक्रम पार पडेल. वडगावदर्या ग्रामस्थ व देवी ट्रस्टच्या वतीने संपुर्ण यात्रेचे नियोजन करण्यात आलेले आहे. भाविकांनी यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन वडगाव दर्या ग्रामस्थांनी केले आहे.
COMMENTS