श्रीगोंदा | नगर सह्याद्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत समविचारी व मैत्रीपूर्ण लोकांना एकत्र घेऊन पूर्ण ताकदीने निवडणूक लढवू. विरोध...
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत समविचारी व मैत्रीपूर्ण लोकांना एकत्र घेऊन पूर्ण ताकदीने निवडणूक लढवू. विरोधकांना चारी मुंड्या चीत करून श्रीगोंदे बाजार समितीवर झेंडा फडकविणार असल्याचे माजी आमदार राहुल जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले .
माजी आमदार राहुल जगताप यांच्या श्रीगोंदे येथील सावली निवासस्थानी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे महासंघ सभापती बाळासाहेब नाहाटा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, काष्टीचे सरपंच साजन पाचपुते, लोणी व्यकनाथचे उपसरपंच मितेश नाहटा, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के उपस्थित होते .
यावेळी बोलताना राहुल जगताप म्हणाले की, श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पूर्ण ताकतीने लढविणार असून ही निवडणूक पक्षविरहित लढणार आहोत. तालुयातील शेतकर्यांच्या मालाला हमीभाव, शेतकरी विकासासाठी वेगवेगळ्या योजना आणून शेतकर्यांना नवसंजीवनी मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहोत. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार बोलताना म्हणाले की, बाळासाहेब नाहाटा यांनी श्रीगोंदा बाजार समितीने राज्यात नावलौकिक केला आहे. या बाजार समितीचा विकास कामाच्या माध्यमातून चेहरा मोहरा बदलला आहे. यावर पत्रकारांनी शेलार यांंना तुम्ही विखेंच्या परवानगीबाबत छेडले असता शेलार यांनी सांगितले ही सहकारी संस्थेची निवडणूक आहे व ही निवडणूक पक्षविरहित आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध येत नाही म्हणून जगताप याच्यासोबत खंबीरपणे काम करणार आहे असेही त्यांनी सांगितले
तालुयातील काष्टी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजेंद्र नागवडे यांनी मला मदत केली कारण मी नागवडे कारखाना निवडणूकीत राजेंद्र नागवडे यांना मदत केली होती म्हणून मला मदत करण्याशिवाय नागवडे यांच्याकडे पर्याय नव्हता, असे सरपंच साजन पाचपुते यांनी सांगितले.
बाबासाहेब भोस यांची कायमच दुहेरी भूमिका ?- हरिदास शिर्के
या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हरिदास शिर्के यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले बाबासाहेब भोस यांचा राष्ट्रवादीमध्ये अधिकृत प्रवेश झालेला नाही आणि या निवडणुकीत ते भाजप आणि कॉग्रेस यांच्यासोबत आहेत त्यामुळे बाबासाहेब कायमच दुहेरी भूमिकेत असतात ते रयत शिक्षण संस्थेच्या कमिटीवर आहेत म्हणून ते राष्ट्रवादीमध्ये आहेत, असेही हरिदास शिर्के यांनी सांगितले
साजन पाचपुते जगताप यांच्यासोबत कसे?
काष्टीचे सरपंच व आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते म्हणाले, की बाजार समितीसाठी नागवडे यांनी स्वतंत्र पॅनल केलाच नाही उलट त्यांनी भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांच्याशी युती केली. त्यामुळे आमदार पाचपुते यांच्यावर माझा विश्वास नाही कारण मला निवडणुकीत उभे करून माझाच पराभव करतील त्यामुळे मी जगताप यांच्यासोबत आहे.
धीरेंद्र शास्त्रींना दुसर्यांचा अपमान
करण्याचा अधिकार कोणी दिला : विखे
COMMENTS