बीड। नगर सहयाद्री - बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. पतीने पत्नीचा खून करून तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मात्र ...
बीड। नगर सहयाद्री -
बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. पतीने पत्नीचा खून करून तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मात्र पत्नीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पोलीस चौकशीत वेगळेच सत्य उघड झाले.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,कौटुंबिक वादातून विवाहितेचा ओढणीने गळा आवळून खून झाल्याची घटना पेठ बीड हद्दीतील युनूस पार्क परिसरात घडली. या प्रकरणात पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर पत्नीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा बनाव तिच्या पतीने केला होता. मात्र पेठ बीड पोलिसांनी केलेली चौकशी आणि मृत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीमुळे आत्महत्येचा बनाव उघडा पडला.
मृत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पेठ बीड भागातील तेलगाव नाका येथील मुस्कान हिचा विवाह १५ महिन्यापूर्वी माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथील शेख शाहेद शेख रूकमोद्दीन ह्याच्यासोबत झाला होता. पात्रूड येथे राहत असतांना नेहमी वाद होत होता. त्यामुळे मुस्कानच्या वडिलांनी तिला बीडमध्ये आणले होते. त्यानंतर ४ ते ५ दिवसांनी जावई शेख शाहेद हा देखील बीडमध्ये आला.
मुस्कान आणि शाहेद दोघेही पेट बीड हद्दीतील युनूस पार्क येथे खोली भाड्याने घेऊन राहत होते. दिनांक ५ एप्रिल रोजी मुस्कान आणि तिच्या पतीमध्ये पात्रूड येथील सामान आणण्याच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर दिनांक ६ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता शेख शाहेद याने मुस्कानच्या वडिलांना फोन करून तुमच्या मुलीची तब्येत बिघडली असून तोंडातून फेस येत असल्याचे सांगितले.
COMMENTS