मुंबई। नगर सहयाद्री - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआ...
मुंबई। नगर सहयाद्री -
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अशी माहिती दिली आहे. आधीचाच रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुमच्या कर्जाचा हप्ता वाढणार नाही. महागाई आटोक्यात येत असल्यानं आरबीआयच्या रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेपो दर 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. याआधी आरबीआयने सलग सहा वेळा रेपो दरात वाढ केली होती. अलीकडे फेडरल रिझर्व्ह, युरोपियन सेंट्रल बँक, बँक ऑफ इंग्लंड यासह जगातील सर्व केंद्रीय बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने मे 2022 पासून रेपो दरात वाढ करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून शेवटच्या पॉलिसीपर्यंत व्याजदर 250 बेसिस पॉइंट्सनी वाढले आहेत.
तीन दिवसांपासून रिझर्व्ह बँकची पतधोरणविषयक बैठक सुरू आहे. या बैठकीचा आज अखेरचा दिवस होता. आरबीआय पुन्हा रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ करू शकते, अशी चर्चा रंगली असल्याने बैठकीकडे संपूर्ण कर्जधारकांचं लक्ष लागून होतं. दरम्यान, आरबीआयनने पतधोरण जाहीर केलं आहे.
COMMENTS