अहमदनगर | नगर सह्याद्री राज्यातील तत्कालीन ठाकरे सरकारच्या वसुलीबाज कारभाराला कंटाळून अनेक मोठे उद्योग राज्याबाहेर गेले. सरकारी अनागोंदीमुळ...
राज्यातील तत्कालीन ठाकरे सरकारच्या वसुलीबाज कारभाराला कंटाळून अनेक मोठे उद्योग राज्याबाहेर गेले. सरकारी अनागोंदीमुळे महाराष्ट्र रसातळाला गेला. कोविड महामारी काळात देशात सर्वात जास्त कोविड रुग्णांचा मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. याला जबाबदार त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. तरीही उद्धव ठाकरे जाहीरपणे आपल्या नाकर्त्या कारभाराबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. त्यांच्या काळात राज्याची वाट लागली आहे. ठाकरे यांनी आपल्या नाकर्त्या, भ्रष्ट कारभाराबद्दल महाराष्ट्राची माफी मागावी, अशा शब्दात भाजप शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी टीका केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गंधे यांनी म्हटले आहे, की स्वतःवर स्तुतिसुमने उधळण्याच्या आत्मकेंद्री स्वभावामुळेच उद्धव ठाकरे यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानाने उभा केलेला पक्ष, चिन्ह, निष्ठावंत कार्यकर्ते गमावले आहेत. नुकतीच पाचोरा येथे झालेल्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या भाषणाची जुनीच टेप वाजवत भाजपवर टीका केली. जगातील सर्वात मोठा पक्ष आणि देशातील सर्वाधिक जनाधार असलेल्या भाजपला पोकळ आव्हाने देण्याआधी त्यांनी मागे वळून आपल्या पाठीशी काय उरले आहे हे तपासावे. मुख्यमंत्री असतानाही आपण घरी बसलात, तसे आत्ताही घरीच बसावे, असे म्हटले आहे.
COMMENTS