मुंबई। नगर सहयाद्री - किरीट सोमय्या यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्...
मुंबई। नगर सहयाद्री -
किरीट सोमय्या यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कथित १९ बंगल्यांच्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत कोर्लाई येथील सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक केली आहे. प्रशांत मिसाळ यांना अटक होताच कोर्लाई गावात एकच खळबळ उडाली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारीला ठाकरे कुटुंबीयांच्या कथित १९ बंगल्यांच्या प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या पत्नी ‘रश्मी ठाकरे’ यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
ग्रामपंचायतीच्या मिळकत नोंद वहीमध्ये बेकायदेशीर नोंदी घेवून खोटे दस्तऐवज तयार करणे आणि शासनाची फसवणूक करणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे पोलिसांकडून नोंदवण्यात आले होते. FIR क्रमांक २६ नुसार, आयपीसी कलम ४२०,४६५, ४६६, ४६८ आणि ३४ प्रमाणे मुरुडच्या ग्राम विकास अधिकारी श्रीमती संगिता भांगरे यांनी हा गुन्हा नोंदवला होता.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यावर किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी १९ बंगल्यांची माहिती लपवली आहे, असा किरीट सोमय्या यांचा दावा आहे. सोमय्यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी ‘उद्धव ठाकरेजी, हिसाब तो देना पडेगा’ म्हणत ट्विटवरून इशारा दिला होता.
आज पोलिसांनी कोर्लाई येथील सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक केली. या अटकेची माहिती किरीट सोमय्या यांनी ट्विट करत दिली. आज उद्धव ठाकरे परिवार १९ बंगलो घोटाळ्यात आज पोलिसांनी प्रशांत मिसाळ कोर्लाई सरपंचाला अटक केली आहे.१९ बंगलोचा हिशोब उद्धव ठाकरे यांना द्यावाच लागणार, असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.
COMMENTS