डॉक्टर तरुणाने संपवलं जीवन, कुटुंबियांच्या मनात प्रश्नांचं काहूर डॉ. कुणाल भाऊराव चव्हाण (वय 35 वर्ष) असं मृत डॉक्टरचं नाव आहे. भंडारा। नगर ...
डॉक्टर तरुणाने संपवलं जीवन, कुटुंबियांच्या मनात प्रश्नांचं काहूर डॉ. कुणाल भाऊराव चव्हाण (वय 35 वर्ष) असं मृत डॉक्टरचं नाव आहे.
भंडारा। नगर सहयाद्री -
भंडारा शहरातील स्नेहनगरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस अली आहे. उद्या लग्न आणि आज तरुण डॉक्टरने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. डॉ. कुणाल भाऊराव चव्हाण (वय 35 वर्ष) असं मृत डॉक्टरचं नाव आहे. नागपूर मेयो रूग्णालयात कुणाल कर्तव्यावर होते.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, काही दिवसापूर्वी डॉ. कुणाल यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील दंत वैद्यकीय तरूणीशी लग्न जमले होते. कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. त्यानुसार 4 एप्रिल लग्नाची तारीख ठरली होती. काल सकाळी झोपून उठल्यानंतर कुणालने चहा घेतला आणि परत आपल्या खोलीत गेला. परंतु बराच वेळ तो बाहेर आलाच नाही.
वडिलांनी खोलीत जाऊन बघितले त्यावेळी त्यांना धक्का बसला. कुणालने दोरीच्या साह्याने पंख्याला गळफास घेतला होता. कुटुंबाने तातडीने दोरी कापून कुणालला खाली उतरवले. त्यानंतर घटनेची माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली. पोलिसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
COMMENTS