अहमदनगर। नगर सहयाद्री - अहमदनगर येथील छत्रपती संभाजी नगर महामार्गावरीलगजराज नगर येथे रात्रीच्यावेळी दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटांनी ...
अहमदनगर। नगर सहयाद्री -
अहमदनगर येथील छत्रपती संभाजी नगर महामार्गावरीलगजराज नगर येथे रात्रीच्यावेळी दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर वाहने जाळली. त्यामुळे तणावच वातावरण निर्माण झाल आहे. ज्या भागात राडा झाला त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, झालेल्या राड्याचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. तसेच पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास करत आहेत.
काल रात्री अहमदनगरमध्ये किरकोळ वादातून दोन गटात तुफान दगडफेक झाली. छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील गजराज नगर येथे ही घटना घडली. या दगडफेकीत चार ते पाचजण जखमी झाले आहेत. जखमी तरुणांव नगर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दगडफेकीत दोन मोटरसायकलसह एका स्विफ्ट कारच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याप्रकरणी 30 ते 40 जणांविरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 10 ते 12 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात असून त्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका
नगरच्या छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील गजराज नगरमध्ये दोन गटात राडा झाल्याची घटना ताजी असतानाच मुकुंद नगर परिसरात देखील दगडफेक झाली. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच शांतता राखावी, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आसुन शहरातील या संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
COMMENTS