अहमदनगर। नगर सहयाद्री - अहमदनगर जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावत बळीराजाचे कंबरडेच मोडले आहे. काल झालेल्या पावसामुळे ...
अहमदनगर। नगर सहयाद्री -
अहमदनगर जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावत बळीराजाचे कंबरडेच मोडले आहे. काल झालेल्या पावसामुळे पुरती दाणादाण उडवली असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठें नुकसान झाले आहे . हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून हा पाऊस शेतकर्यांच्या जीवावर उठला आहे.
नगरमध्ये काल रात्री वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपून काढले आहे. हातात आलेल्या पिकाचे फळबागांचे माेठे नुकसान झाले आहे जिल्ह्यात साडे हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. काल रात्री विजेच्या कडकडट्यांसह वादळामुळे नुकसान झाले आहे.
कलिंगड, खरबूज, टोमॅटो, कांदा व झेंडू हे पीक काढणीला आलेले असताना हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. त्यामुळे एकीकडे शेतीमालाला भाव नसल्याने व दुसरीकडे अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. जिल्ह्यामधील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.
वादळामुळे अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळील मोठा वृक्ष वादळामुळे पडला. त्यानंतर तातडीने अग्निशामक दलाशी संपर्क करून घटनेची माहिती दिली.अग्निशामक दलाने कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेऊन अथक प्रयत्नानंतर पडलेला वृक्ष बाजूला केला आणि आरोग्यसेवा पूर्वरत सुरू केली. वादळी वाऱ्यामुळे शहरात ठिकठिकाणी फ्लेक्सचे नुकसान झाले.
अवकाळी पावसाने थैमान घातले असून अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. काढून ठेवलेला कापूस आणि गहू पावसाने ओला झल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरांचे पत्रे उडून गेले असून अनेक ठिकाणी मोठमोठे झाडे पडल्याने वीज खंडित झाली आहे.
COMMENTS