नाशिकच्या सटाणा तालूक्यातील लखमापूर येथे ही घटना घडली आहे. नाशिक। नगर सहयाद्री - नाशिकच्या सटाणा तालूक्यामधून हृदयद्रावक बातमी समोर अली आहे....
नाशिकच्या सटाणा तालूक्यातील लखमापूर येथे ही घटना घडली आहे.
नाशिक। नगर सहयाद्री -
नाशिकच्या सटाणा तालूक्यामधून हृदयद्रावक बातमी समोर अली आहे. पाच वर्षांच्या चिमुकलीचा गरम तेलाच्या कढईत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत चिमुकलीच नाव वैष्णवी पवार आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, गरम तेलाच्या कढईत पडून 6 वर्षांच्या चिमुकलीचा भाजून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. समाधान निंबा पवार यांचा खाद्य पदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे.त्यामुळे ते खाद्य पदार्थ तयार करत होते. दरम्यान त्यांच काम संपल्यानंतर त्यांनी गरम तेलाची कढाई खाली उतरून ठेवली. त्यानंतर दुसऱ्या कामात ते व्यस्त होते.
कामात व्यस्त असताना त्यांची सहा वर्षाची मुलगी वैष्णवी खेळता खेळता तोल जाऊन गरम असलेल्या तेलाच्या कढाईत जाऊन पडली. मुलगी कढईत पडल्याचं लक्षात येताच समधान यांनी तिला कढाईतून बाहेर काढले. वैष्णवी या घटनेत गंभीररित्या भाजली होती. त्यानंतर तिला अधिक उपचारासाठी नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
COMMENTS