निघोज | नगर सह्याद्री राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या निघोज येथील मंळगंगा देवीचा मुख्य यात्रा उत्सव गुरुवार दि. १३ पासून सुरू होत असून बुधव...
निघोज | नगर सह्याद्री
राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या निघोज येथील मंळगंगा देवीचा मुख्य यात्रा उत्सव गुरुवार दि. १३ पासून सुरू होत असून बुधवार दि. ५ रोजी मळगंगा देवीला हळद लावून यात्रा उत्सवाची सुरुवात करण्यात आली.
देवीच्या हळदीची मिरवणूक वाजतगाजत काढण्यात आली. यावेळी हजारो महिला भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी मंळगंगा देवीचा जयजयकार करीत महिला भाविकांनी देवीच्या सेवेचा आनंद घेतला. यावेळी मंळगंगा देवीच्या गाभार्यात जाउन देवीला महिला भगीनीनी हळद लावीत हळद खेळण्याचा आनंद घेतला. मंळगंगा देवी हे जागृत देवस्थान म्हणून राज्यात प्रसिद्ध असून यात्रा उत्सवासाठी लाखो भावीक मोठ्या संख्येने उपस्थित राहात असतात.
यात्रेचा मुख्य यात्रा उत्सव गुरूवार दि.१३ दुपारी बगाड गाडा मिरवणूक, देवीला अंबील वर्तविणे, त्या नंतर लाखो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन. रात्री नऊ वाजता देवीच्या छबिण्याची मिरवणूक, रात्री उशिरा ११ वाजता देवीच्या हेमांडपंथी बारवेमध्ये घागर दर्शन, शुक्रवार दि. १४ रोजी सकाळी ७ वाजता घागरीची सवाद्य मिरवणूक, त्यानंतर दुपारी तीन वाजता पालखीची मिरवणूक कुंडावर जाते त्या नंतर कुंडावरील यात्रा सुरू होते.
शनिवार दि. १५ रोजी कुंडावर दुपारी चार वाजता कुस्ती हगामा सुरू होतो. राज्यातील नामवंत पैलवान या मध्ये सहभागी होत असतात यासाठी लाखो रुपयांचे बक्षीसे देण्यात येतात. अशाप्रकारे तब्बल चार दिवस ही यात्रा संपन्न होत आहे. मंळगंगा देवीचे पुजारी गायखे बंधू शेकडो वर्षांपासून देवीची पुजा अर्चा करीत आहेत. घागरीचा मिरवणूक मान गायखे कुटुंबाला आहे. ग्रामपंचायत, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, निघोज व मुंबईकर मंडळ या यात्रेचे नियोजन करीत असतात.
COMMENTS