सोलापूर। नगर सहयाद्री - सोलापूर मधील बार्शीतील निर्मला महादेव धनवे या ५५ वर्षीय महिलेचा ८ एप्रिल रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. पोलीस तपास...
सोलापूर। नगर सहयाद्री -
सोलापूर मधील बार्शीतील निर्मला महादेव धनवे या ५५ वर्षीय महिलेचा ८ एप्रिल रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. पोलीस तपासा दरम्यान धक्कादायक माहिती समोर आल्यामुळेया प्रकरणात पोलिसांनी मृत महिलेच्या सुनेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोमल अनिल धनवे असे या आरोपी सूनेचे नाव आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी सासू निर्मला हिचे पैसे आणि गंठण चोरीला गेले होते. या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून सासू-सुनेमध्ये सतत वाद होत होते. सुन कोमल हिनेच पैसे आणि गंठण चोरल्याचा आरोप सासू निर्मला करत होती. दरम्यान शनिवारी ८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेसहाच्या सुमारास कोमलने घरामध्ये कोणी नसताना सासूचा गळा आवळून आणि डोक्यात जखम करुन तिची हत्या केली.
पुरावे नष्ट करण्यासाठी तिने निर्मलाचा पडून मृत्यू झाल्याचा खोटा बनवा केला. परंतु ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र माळी यांच्याकडून निर्मलाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून गळा आवळून तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात सुनेविरोधात हत्येचा तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS